
बातमी 24तास ( वृत्त सेवा ) स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा खेड तालुक्याच्या वतीने शनिवार दि. 22-11-2025 रोजी शिरोली ता.खेड,जि.पुणे येथील जिल्हा परिषद शाळेत “चला संविधान समजून घेऊया “ हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र सल्लगार ऍड. साधनाताई बाजारे या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे राज्य अध्यक्ष हरेशभाई देखणे होते. साधना बाजारे यांनी शालेय विद्यार्थना संविधानाबद्दलची अगदी सोप्या भाषेत माहिती दिली व मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हरेशभाई देखणे यांनी सांगितले की 26 नोव्हे 1949 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांना भारतीय राज्यघटनेचा मसूदा सादर केला. व तो मसुदा राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी स्वीकारला. म्हणून 26 नोव्हे हा संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेचे वाचन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ईश्वर इंगळे यांनी केले. या कार्यक्रमाला स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे राज्य सदस्य दिलीप पालवे. जिल्हा संपर्कप्रमुख विकास शिंदे,प्रभारी मुख्याध्यापक विष्णू गोडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मंगेशभाऊ सावंत, शिरोली गावच्या पोलीस पाटील निर्मला देखणे, स्वाभिमानी रिपब्लिकन महासभेचे जिल्हा कार्याध्यक्ष विनोद हिवराळे,खेड तालुका उपाध्यक्ष इम्रान हाशमी, खेड ता. प्रवाक्ता ईश्वर इंगळे, खेड ता. संघटिका सुरेखा पालवे, चाकण शहर उपाध्यक्ष मीनाताई आंबेकर ,सामाजिक कार्यकर्ते सुमित शिंदे तसेच जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.